आजपासून इंटरनेट वेगवान ; भारतात 5G क्रांती !

नवी दिल्ली :  आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं आहे.

या १३ शहरांना प्रथम वापरता येणार 5G सेवा
दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील 13  शहरांमध्ये उपलब्ध होईल. 2022 मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे 5जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील.

5G इंटरनेट सेवा सुरु होणार या पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधापासून 5जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली होती. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन लाँच केला आहे. रिलायन्स जिओ , एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करतेय, हे पाहावं लागेल.

काय आहे 5G नेटवर्क?
5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G , 3G , 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.

Share