गुवाहाटी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास शिवसेनेचे ४० आमदारांसह बंडाचं निशाण फडकावून गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. शिवसैनिक शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत तमाम शिवसैनिकांना आवाहन केलं आहे
एकनाथ शिंदे आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात की, ‘शिवसैनिकांनो नीट समजून घ्या, मविआचा खेळ ओळखा. मविआसारख्या अजगाराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीत समर्पित,’ असे भावनिक आवाहनं शिंदेनी केलं आहे.
प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.#MiShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
दरम्यान, दुसरीकडे राज्यात शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झालेलं पहायला मिळतं आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदेचे पोस्टर फाडले जात आहेत. तर, आमदार तानाजी सावंत, दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तसेच, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर देखील कोल्हापुरात फाडण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे भावनिक ट्वीट केल्याचं मानलं जातं आहे.