सांगली : संपुर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. तर विरोधी गटाला म्हणजे शेतकरी विकास पॅनेलला ६ जागांवर विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेवार विजय झाला आहे.
दरम्यान रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य चर्चेंचा विषय ठरलं होतं. त्यांच्या भाविनक वक्तयावर जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दिला सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
कर्जत जामखेड नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच वर्चस्व
नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने एकहात्ती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीच्या १७ पैकी १२ जागावर राष्ट्रवादी काॅग्रेस विजय झाली आहे. तर भाजपला केवळ २ जागांवर सामाधान मानावे लागेला आहे़.