सोयगाव नगरपंचायत सेनेच्या ताब्यात, दानवेंना धक्का

औरंगाबाद-  जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायत निकाल आज लागला असून यात शिवसेनेने बाजी मारली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या दोघांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.शिवसेनेने ११ जागेवर तर भाजपने ६ जागा मिळवल्या आहेत.

एकूण १७ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात सत्तार यांनी बाजी मारली आहे. हे दोघेही पारंपरिक राजकीय विरोधक आहे. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेतली होती. या प्रसंगी भाजप-शिवसेना युतीवरुन राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले होते.

निकाल जाहिर झाल्यावर आता नगरअध्यक्ष पदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. या पदासाठी दोन्हीपक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच इच्छुकांच्या बैठका देखील रंगू लागल्या आहेत.त्यामुळे नगरअध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Share