लॉरियस क्रीडा पुरस्कार, काय आहे जाणून घ्या

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने याला जगातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नीरजला नामांकन मिळालं आहे. या आधी हा पुरस्कार क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मिळाला  आहे. नीरज चोप्राने २०२१ मध्ये पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. आता त्याला लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नीरजला नामांकन मिळाले आहे नीरजने स्वत: याबाबत ट्वीट देखील केले आहे.

भारत सरकारनेही नीरज चोप्राला खेलरत्न सारख मानाचा पुरस्कार दिला. पण आता जगातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नीरजला नामांकन मिळालं आहे. या पुरस्कारासाठी विविध क्रिडाक्षेत्रातील सहा मानाच्या खेळाडूंना नामांकित केलं असून नीरज यातील एक आहे.

लॉरियस क्रीडा पुरस्कार ?

१९९९मध्ये स्पोर्ट्स फॉर गुड फाऊंडेशनच्या डेमलर आणि रिचमाउंट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. खेळाच्या माध्यमातून जगातील हिंसा, भेदभाव संपवणे आणि खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे हे सिद्ध करणे हे या फाउंडेशनचे ध्येय आहे. लॉरियस हा शब्द लॉरेल या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ अॅथलेटिक्स स्पर्धेतील विजयी मुद्रा दर्शवतो.

२५ मे २००० रोजी मॉन्टे कार्लो येथे प्रथमच हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी व्याख्यान दिले होते. २०१९ पासून हे पुरस्कार आठ श्रेणींमध्ये संघ आणि वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिले जातात. यामध्ये लॉरियसचा पुतळा बक्षीस म्हणून दिला जातो.

 

 

Share