मुंबईः पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने २४ एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. दीदींच्या ओळखीचा आणि दीदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी असायला हवा. १५ वर्षांपूर्वी आम्ही दीनानाथ मंगेशकर नवं हॉस्पिटल बांधलं होते तेव्हा नरेंद्र मोदींनी या हॉस्पिटलचे उद्घाटन केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दरम्यान भाषणात लता दिदींनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती असे ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्काराविषयी बोलताना म्हणाले. उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘लता दिनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आदरणीय लतादिदी मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ यंदापासून दिला जाणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जाहीर झाला. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
मा. @narendramodi जी यांचे देशासाठी कार्य आणि सेवाभाव यासाठी त्यांना हा पुरस्कार मुंबईत प्रदान करणार !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 11, 2022
“माननीय पंतप्रधानांचे अभिनंदन. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. लता दीदींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. हा पुरस्कार माननीय पंतप्रधान मोदीजींना मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे”. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हणाले.