कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा झाला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे . यानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं . यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे.
A new low for democracy in West Bengal.
TMC MLAs assaulted BJP MLAs inside the assembly on demanding the discussion on Rampurhat massacre.
Political violence, murders, rapes and appeasement is increasing in Bengal under @MamataOfficial govt with each passing day. pic.twitter.com/Xtmk19Y4p1
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) March 28, 2022
विधानसभेतील व्हिडीओ आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. त्यांना मला ढकललं, शर्ट फाडला, असं ते सांगत आहेत. यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. आम्ही बिरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असताना सत्ताधारी आमदारांनी आम्हाला मारहाण केल्याचं सांगत ते सभागृहातून बाहेर पडले.निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या आमदारांमध्ये सुवेंद्रू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बर्मन यांचा समावेश आहे.
बीरभूम प्रकरण नेमक काय ?
२२ मार्चला घरांना आग लावल्यानंतर ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. बोगतुई गावात अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब टाकत १० घरांना आग लावली होती. स्थानिक पंचायतीमधील तृणमूल काँग्रेसच्या उपप्रमुखाची हत्या झाल्यानंतर ही घटना घडली होती. शुक्रवारी कोलकाता हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. याच घटनेवरुन पश्चिम बंगालमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोंधळ पहायला मिळाला.