प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी- गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज प्रमोद सांवंत यांनी दुसऱ्यांदा घेतली आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. सावंत गोव्याचे १४ वे मुख्यमंत्री आहेत.  राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली.

सावंत यांच्या शपथविधी समारोहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री अमित शहा, आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमोद सावंत यांच्या समावेत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे.  या सर्व मंत्र्यांना  आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सावंत हे लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे सुत्रांच्या माहितीनूसार सांगण्यात येत आहे.

 

 

Share