नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या दिल्ली कार्यालयातून राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांच्यातर्फे प्रसिद्धीस पाठवण्यात आली.#NCP #GoaElections2022 pic.twitter.com/kYBPzQhBGk
— NCP (@NCPspeaks) February 2, 2022
स्टार प्रचारक यादी
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
- नवाब मलिक, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
- ए. के. ससिनद्रन, केरळचे वनमंत्री
- नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते
- फौजिया खान, खासदार
- धीरज शर्मा, युवक राष्ट्रीय अध्यक्ष
- सोनिया दुहन, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा
- शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष
- जोसे फिलीप डिसोजा, गोवा अध्यक्ष
- डॉ. प्रफुल हेडे
- अविनाश भोसले
- सतिश नारायणी (गोवा),
- पी. सी. चोको, केरळचे अध्यक्ष
- थॉमस के. थॉमस, केरळचे आमदार
- क्लाईड क्रास्टो, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते
या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे.