मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर जमीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. १ लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल १३ महिन्यांनंतर देशमुखांना जामीन मंजूर झाला असल्या तरी देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.
BREAKING – #BombayHC grants bail to
Maha former home minister, #AnilDeshmukh, in a corruption case investigated by #CBI.@AnilDeshmukhNCP pic.twitter.com/XyqXFaLlYa— Live Law (@LiveLawIndia) December 12, 2022
अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. पण सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकरणी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाला तुर्तास स्थगिती देण्याची विनंती कोर्टासमोर करण्यात आली. त्यामुळे देशमुखांना जामीन मिळाला असला तरी जेलबाहेर येण्याचा त्यांचा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला होता. तसंच आता सीबीआयनेही सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला आहे.