मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे यांना चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते त्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. आज संजय पांडे यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात काल तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. तसेच त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचे देखील आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान ईडीने काल त्यांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले.
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
— ANI (@ANI) July 19, 2022
सीबीआयच्या आरोपानुसार नारायण आणि रामकृष्ण, वाराणसी आणि हल्दीपूर यांनी २००९ ते २०१७ दरम्यान एनएसई कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा कट रचला. ज्यासाठी त्यांनी २००१ मध्ये पांडे यांनी स्थापन केलेल्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कामावर ठेवले होते. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगसाठी पांडेंच्या कंपनीला ४.४५ कोटी रुपये मिळाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
एनएसई कर्मचाऱ्यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडी आणि सीबीआय यांनी पांडेंवर गुन्हा दाखल केला होता. सीबीआय आणि आता ईडीने पांडे आणि त्यांची दिल्लीस्थित कंपनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश हल्दीपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चित्रा रामकृष्ण यांच्या काळात झालेला एनएसईतील गैरव्यवहार लेखापरीक्षणात का उघड झाला नाही, याची चौकशी करण्यात आली.