नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता गोरठा, ता.उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार पद भुषवले होते. शब्द पाळणारा, प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख होती. विरोधक असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोरठेकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मागील वर्षी गोरठेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. काही दिवसांपासून गोरठेकर आजारी होते.