“आजपासून तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायका, अयोध्येला जायची गरज नाही”; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्याद यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आजपासून तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायका, अयोध्येला जायची गरज नाही”, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

दीपाली सय्याद यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं की, आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक! असं ट्विट दीपाली सय्याद यांनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पंरतू उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी थेट इशारा दिला. राज ठाकरे यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा पुढे करत उत्तर भारतीयांना हिणवलं. त्यामुळे अयोध्येत यायचं असेल तर माफी मागावी अन्यथा पाय ठेवू देणार नाही, असं ओपन चॅलेंज बृजभूषण सिंह यांनी दिलं. आधी सौम्य वाटणारा हा विरोध नंतर तीव्र झाला. अखेर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द झाल्याची घोषणा केली. याच मुद्द्याच्या आधारे दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Share