आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु

मुंबई : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राह लागले होते. सध्या राज्यातील कोरोना स्थिती साधरण असल्यानं सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरात आजपासून म्हणजेच, १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत.

राज्यभरात आजपासून म्हणजेच, १३ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा जरी १३ जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं.

दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात शैक्षणिक सत्र २०२२- २३ सुरू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी निर्देश जारी केले. १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात सांगण्यात आलं आहे.

Share