आज घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे.आजच्या दिवशी घटस्थानपना करण्यात येते. नऊ दिवसांसाठी देवीची प्रतिष्ठापना केली जाते. अनेकजण नऊ दिवसांसाठी निर्जली उपवास करतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. यंदा आज म्हणजेच, आज २६ सप्टेंबरपासून नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. जाणून घेऊया, घटस्थापनेचा विधी…

शारदीय नवरात्रोत्सव आणि कलश स्थापनेचा मुहूर्त आणि वेळ

यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि वेळ पहाटे ०३:२३ ते २७ सप्टेंबर रोजी पहाटे ०३: ०८ पर्यंत आहे. दुपारी १.४५ वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी १.४५ वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल, तर तुम्ही ती अभिजीत मुहूर्तावर दुपारी ११.४८ ते १२.३६ या वेळेत करू शकता. अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

नवरात्रीत घटस्थापनेला महत्व
हिंदू धर्मानुसार, नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे.  कलश हे गणेशाचे रूप आहे, तर या कलश आणि त्यामध्ये आमंत्रण केलेल्या देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा. या ठिकाणी दोन इंच मातीत वाळू आणि सप्तामृत मिसळून पसरवून घ्या. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा. कलशाला धागा बांधा.

Share