वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – काॅग्रेस

मुंबई : वेदांत- फाॅक्सकाॅन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे हा. प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे. त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदाता व वेदांता-फाॅक्सकाॅन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपुर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत वेदांताच्या गुंतवणुकीसंदर्भात खोटी माहिती दिली. वेदांताचा प्रकल्प फडणवीस यांच्या काळातच आला आणि गेला, तो प्रकल्प मोबाईलचा होता तर वेदांता-फाॅक्सकाॅन हा १ लाख ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगार निर्माण होणार प्रकल्प होता, हा प्रकल्प सेमी कंडक्टरचा होता. यासंदर्भात १५ जुलै २०२१ रोजी सचिवांची उच्चस्तरिय बैठक झाली, सहा-सात विभागाच्या सचिवांचा या बैठकीत सहभाग होता. या उच्चस्तरिय बैठीकत वेदांता-फाॅक्सकाॅनला किती व कोणत्या सवलती द्यायच्या याचे निर्णय झाले. पाणी, वीज,जमीन,विविध कर यामध्ये सवलती देण्यावर निर्णय झाला अस त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर वेदांत-फाॅक्सकाॅन प्रकरणी एका व्यक्तीने माहिती अधिकाराखाली अर्ज केला व त्या व्यक्तिला विशेष जलतगती सेवा देत त्याच दिवशी संध्याकाळपर्यत माहिती देण्यात आली. फडणवीस हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्याचा अश्याघ्य प्रकार करत असून आयटीआय मधून त्यांनी तेच केले. आपल्या हातून झालेल्या चुका लपवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. शिंदे-फडणीस सरकार चुका लपवण्याचे काम करत आहे. फडणवीसांच्या काळात १६ लाख कोंटीचे करार झाले होते पण १६ रुपयांचीही गुंतवणूकही आली नाही. असे लोंढे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात पक्षीय राजकरण न करता जास्तीत जास्त गुंतवणूक व जास्त रोजगार आणले पाहिजेत, यासाठी विरोधी पक्षही सरकारला मदत करण्यास तयार आहे. पण भाजपचे राजकारण हे धर्मावर व  श्रेय लाटण्याचे राजकारण आहे. तसेच १२ कोटी जनतेला धोका कसा द्यायचा हेच भाजपा व फडणवीस यांचे राजकारण आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो असंही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढें यांनी म्हटलं.

Share