भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

अहमदनगर- भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली आहे. विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात सक्रिय पध्दतीने सहभाग नोंदवला होता.तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नाला देखील उपस्थित होते.या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते.

Share