आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल, चेक करा नवे दर

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल ८ रुपये आणि डिझेलच्या दरात ६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईत भरडल्या जाणाऱ्या जनतेला दिलासा मिळत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.४३ रुपये तर डिझेलचा दर ९५.९० रुपये प्रति लिटर आहे. तर नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.०८ रुपये तर डिझेलचा दर ९५.५९ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share