खेळाडूंसाठी जलतरण सुरू करा-अजित पवार

मुंबईः  जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार म्हणाले, लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत  सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी.

वर्धक मात्रेसाठी सुविधा देण्याचे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. महापालिका क्षेत्रात १५ ते १८वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्यात.

 

Share