मुंबई : ईडीने संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्यांची अलिबागमधील भूखंड आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्यानंतर आता संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असत्यमेव जयते, असं ट्विट केलं आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1511267876396683270?s=20&t=dwk7OuhaBucDYM8BYhp-4Q
संजय राऊत म्हणाले, ईडीने त्यांची कबर खणायला सुरुवात केली आहे. त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे. ईडीने आरोप सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडून माझी सर्व संपत्ती भाजपच्या नावावर करेन, असा खुलं आव्हान देखील संजय राऊतांनी ईडीला दिलं आहे. तसेच मला यापूर्वी कुठलीही नोटीस दिलेली नाही. ईडीने थेट ही कारवाई केली आहे. माझ्यावर ५५ लाखांचं कर्ज देखील आहे. त्याबाबत मी शपथपत्रात माहिती दिली आहे. माझ्या राहत्या घरावर ईडीने कारवाई केली आहे, असं संजय राऊत माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.