बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्धघाटन

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जुलै रोजी उत्तर प्रदेशातील २९६ किमी लांबीच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे (एक्सप्रेसवेचे ) उद्धघाटन करणार आहेत. चित्रकूट आणि इटावा दरम्यान पसरलेला हा द्रुतगती महामार्गाचे काम २८ महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उद्धघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली की, पंतप्रधान मोदी १६ जुलै २०२२ रोजी उत्तर प्रदेशला भेट देतील आणि जालौन जिल्ह्यातील उरई तहसीलमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्धघाटन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्धघाटन होणार आहे. देशभरात दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे आणि रस्तेविषयक पायाभूत सुविधा सुधारण्याची कामे हाती घेणे हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पंतप्रधानांच्या हस्ते २९ फेब्रुवारी २०२० रोजी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला रचणे हा या दिशेने केलेला महत्त्वाचा प्रयत्न होता. या द्रुतगती महामार्गाचे काम २८ महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उद्धघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सामान्य लोकांना मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध सुविधांशी जोडले जाईल. अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा एक्स्प्रेस वे चित्रकूट जिल्ह्यातील भरतकुपजवळून सुरू होतो आणि इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेला जोडतो. त्यात चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया आणि इटावा या ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. रस्त्याची लांबी बागान, केन, श्यामा, चांदवल, बिरमा, यमुना, बेतवा आणि सेंगर या अनेक नद्या ओलांडते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील सर्वात मागास प्रदेशांपैकी एक मानला जाणारा बुंदेलखंड आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाचे आणि यमुना एक्सप्रेसवेद्वारे थेट राष्ट्रीय राजधानीशी जोडला जाईल. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गा मुळे दिल्ली आणि चित्रकूट दरम्यानचा प्रवास वेळ आधीच्या ९-१० तासांच्या तुलनेत फक्त ६ तासांवर येण्याची अपेक्षा आहे. आगामी उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉर प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी बुंदेलखंड एक्सप्रेसवे देखील महत्त्वपूर्ण आहे.

Share