शिवसेनेच्या आणखी एक नेत्याच्या घरावर आयकरची छापेमारी

मुंबई : शिवसेनेच्या आणखी एका नेत्यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल  यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आयकर विभागाचे अधिकारी आज सकाळी सीआरपीएफ जवानांची सुरक्षाव्यवस्था घेऊन राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. आता या धाडीतून आयकर विभागाच्या हाती काय लागणार, हे पाहाणे महत्वाचे ठरेल.

कोण आहेत राहुल कनाल?
राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत. ते मातोश्रीच्या जवळच्या नेंत्यांपैकी एक आहेत. तसेच कनाल हे युवासेनेच्या कोअर कमिटीचा भाग आहेत. या शिवाय राहुल कनाल हे उद्योजक आहेत.

Share