ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, केंद्राने दिली Z Plus सुरक्षा !

दिल्ली– एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात जीवीत हाणी झाली नाही. या घटनेचा आढावा घेत केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने त्यांना सीआरपीएफ झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार असल्याच म्हंटल आहे.

तर, हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”. असं ओवेसी म्हणाले होते.

Share