‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला, तरी त्याचा प्रभाव अद्यापही कायम आहे. यातून बॉलिवूड इंडस्ट्रीही सुटू शकली नाही. कोरोनाच्या दोन लाटांत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी स्वत:ला वाचवण्यात यश मिळवले असताना, मात्र तिसऱ्या लाटेत एकापाठोपाठ एक कोरोना विषाणूला बळी पडत आहेत. आता बॉलिवूडची अभिनेत्री जया बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. २०२० मध्ये जया बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीही कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण त्यावेळी जया यातून बचावल्या होता.

करण जोहरचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या सेट वर काहीदिवसांपूर्वी अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली होती. नंतर आता अभिनेत्री जया बच्चन कोरोनाची लागम झाली आहे. दोन्ही अभिनेत्री या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पुढील चित्रिकरण दिल्ली येथे होणार होते. मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.

Share