INDvsSL t20 : श्रेयस अय्यरच्या खेळीमुळे मालिका विजयी

धर्मशाला-  रोहित शर्माच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया खेळत आहे. वेस्टइंडीज नंतर भारताने श्रीलंकेला नमवत टी२० मालिका आपल्या खिशात टाकली आहे. धर्मशाला येथे झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखत हा सामना जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने दोन सामन्यावर विजय मिळवत मालिका विजय मिळवला आहे.

भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद ७४), संजू सॅमसन (३९) आणि रवींद्र जडेजा (१८ चेंडूत नाबाद ४५) यांनी धुवांधार फलंदाजी करत श्रीलंकेचे आव्हान १७.१ षटकातच पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 संघांचे प्लेइंग इलेव्हन-

भारत –

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल

श्रीलंका –

पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरिथ असलांका, दानुष्का गुणातिलका, दिनेश चंडिमल (यष्टीरक्षक), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.

Share