मुंबईः इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या २०२२ च्या १५ व्या सीझनमध्ये एकूण १० संघांचा समावेश आहे. २७ मार्चपासून आयपीएल २०२२ ची सुरुवात सुरू होऊ शकते आणि स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी खेळवला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचे सर्व सामने अहमदाबाद, मुंबई आणि पुण्यातील ६ मैदानांवर खेळवले जाऊ शकतात.महाराष्ट्रातील लीग टप्प्यातील सर्व ७० सामने आणि प्लेऑफ सामने अहमदाबादमध्ये खेळवले जातील. मुंबईत होणारे सर्व सामने वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डीवाय पाटील आणि रिलायन्स जिओ स्टेडियमवर खेळवले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे वेळापत्रक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करू शकते.