गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज

मुंबईः संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही प्रमुख भूमिका साकारली आहे. आज या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे.या ट्रेलरमध्ये आलिया वेगळ्या अंदाजात पहायला मिळतेय. या नव्या ट्रेलरमध्ये गंगूबाई आणि करिम लाला यांची केमेस्ट्री पहायला मिळतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

https://www.instagram.com/tv/CaJkqZvAkUv/?utm_source=ig_web_copy_link

आलियाने इंस्टाग्राम अकाउंटवर या ट्रेलर शेअर केला आहे. या नव्या ट्रेलरमध्ये गंगूबाई आणि करिम लाला यांची केमेस्ट्री पहायला मिळतेय. करिम लाला आणि गंगूबाई यांचे बहिण भावाचे नाते होते. त्यांच्यातल्या नात्यावर हा ट्रेलर अधिक भाष्य करतो. ट्रेलरच्या शेवटी करिम लाला गंगूबाई तुला ही लढाई जिंकावीच लागेल, असे करिम लाला म्हणताना दिसतोय. या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. या ट्रेलरला आतापर्यंत २२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर दीड हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

चित्रपटात मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तेथील माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. अजय देवगण या चित्रपटात करीम लाला ही भूमिका साकारली आहे.

Share