मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकर्पण कार्यक्रम पार पडला. पण यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्धघाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याच्या राजशिष्टाचार अजित पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही? असा संपप्त सवाल राष्ट्रवादीचे युवक काॅँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी विचारला आहे.
देहू येथे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात फडणवीसांना बोलण्याची संधी दिली जाते पण राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादांना नकार दिला. @PMOIndia ने हे राजकारण कोणाच्या सांगण्यावरून केले. @NCPspeaks @AjitPawarSpeaks @TV9Marathi @BJP4Maharashtra @3kmIndia pic.twitter.com/JmJwaXWjqj
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) June 14, 2022