राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का ? केंद्र सरकार आपला राजशिष्टाचार का पाळत नाही ? रविकांत वरपे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकर्पण कार्यक्रम पार पडला. पण यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्धघाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याच्या राजशिष्टाचार अजित पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही? असा संपप्त सवाल राष्ट्रवादीचे युवक काॅँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी विचारला आहे.

हा महाराष्ट्रचा अपमान 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देण हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते? अजित पवाराच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. तसेच माळळचे खा. श्रीरंग बारणे आणि आ. सुनिल शेळके या लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नव्हते हे दोन्ही या महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय?

पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकाॅलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले असून पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकाॅमध्ये बसत असताना अजित पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकरण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबात पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी असही रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
Share