मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच दरम्यान आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो शेअर करत शिवरायांच्या अपमानावर भाष्य केलंय.
काय म्हणाले उदय सामंत ?
“राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???” असं सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना…
आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का??? pic.twitter.com/gN1GoAqrjb
— Uday Samant (@samant_uday) November 27, 2022
राज्यपाल कोश्यारी काय म्हटले होते?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांना जुन्या युगाचे नायक म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांना माघारी पाठवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यांनी या मुद्यावरून भाजपवरही टीका केली.