जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला; अंबर हर्डला मोठा धक्का

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची सरशी झाली आहे. जॉनी डेपला आता १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १.५ अब्ज रुपयांची नुकसान भरपाई मिळेल. अंबरने आपली बदनामी केली हे सिद्ध करण्यात जॉनी सक्षम असल्याचे ज्युरींनी सांगितले. हा खटला जॉनी डेपने जिंकला असला तरी काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने डेपलादेखील दोषी ठरवले आहे. त्यामुळे अंबर हर्डला १५ मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई जॉनी डेपला द्यावी लागणार आहे.

प्रचंड गोंधळ, अनेक पुरावे, साक्षी आणि तासन् तास चाललेल्या सुनावणीनंतर सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अंबर हर्डने एका लेखात जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. २०१८ मध्ये हा लेख प्रकाशित झाला होता. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जॉनीने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंबरने जॉनीवर अनेक गंभीर आरोप केले. बळजबरीने लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने जॉनीवर केला. या प्रकरणात ज्युरीने अंबर हर्डसह जॉनी डेपला अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. त्यामुळे हर्डला २ दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल देताच त्याच्या वकिलांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी सारेच भावुक झाले होते. सर्वांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, डेपचे चाहतेही या निर्णयामुळे आनंदी झाले. जॉनी डेपने पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्युरींनी त्याला त्याचे आयुष्य परत दिले आहे, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर अंबर हर्डनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, तिला खूप निराश वाटतेय. आवाज उठवणाऱ्या इतर महिलांनाही या

२०१७ मध्ये झाला घटस्फोट
जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. याआधी हे दोघे अनेक वर्षे डेटवर होते. त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. कारण, लग्नाच्या एक वर्षानंतर, २०१६ मध्ये अंबरने जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Share