अंकिताला मिळालेला न्याय हा न्यायव्यवस्थेचा विजय – मंत्री केदार

वर्धा : हिंगणघाट येथील शिक्षिका अंकिता हिला जाळून मारणाऱ्या नराधम विक्की नगराळे याला शेवटी जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्ह्यातील बहुचर्चित अंकिता हत्याकांडाचा निकाल हा महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व नराधमांना एक चपराक आहे. या निर्णयामुळे अंकिता परत मिळणार नाही, हे सत्य असले तरी मृत अंकिताच्या कुटुंबियांना व समाजाला न्याय व्यवस्थेने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची झालेली हानी ही न भरून निघणारी आहे. परंतु थोड्याफार प्रमाणात या निर्णयामुळे त्यांचे सांत्वन झाले व कुठे तरी मृत अंकिताच्या आत्म्याला शांती मिळेल. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे खटला लढणारे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचे विशेष आभार. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे आणि यापुढे देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय शासन कदापि करणार नाही, असे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले.

Share