सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल- चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणए महानगरपालिकेत गेले असताना शिवसैनिकांनी त्यांच्या हल्लाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे. भाजप हा विषय सोडणार नाही आणि किरीट सोमय्या   यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, किरीय सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत गेले असतना शिवसैनिकांनी हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का? याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्र्याना पत्र लिहिले आहे. सोमय्या यांना झेड सुरक्षाव्यवस्था असल्याने त्यांच्या भेटीच्या आधी पोलिसांंनी तपासणी करणे आवश्यक असते. तरीही त्यावेळी शंभरजण इमारतीत लाठ्या आणि दगड घेऊन कसे होत. पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्ववस्थाही काय करत होती, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनाही धक्काबुक्की झाली. केंद्र सरकारने या हल्लाची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे सुरक्षा प्रमुख तीन दिवस पुण्यात आहेत. त्यांनी पुण्याच्या पोलिस प्रमुखांनाही नोटीस दिली आहे. अशी माहितीही चंद्राकांत पाटील यांनी दिलीय.

काॅंग्रेसवर पलटवार

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सार्वधिक कोरोना मृत्यू झाले, त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले, त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजूरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वाचा जाब खरे तर काॅग्रेसने मुख्यमंत्र्याना विचारायला हवा होता व त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती. अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काॅग्रेसवर पलटवार केलाय.

आंदोलनाचा इशारा

तसंच किराणा दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी, परमविरसिंग यांनी सचिन वाझेबाबत आरोप केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे टाळणे, पोलिसांच्या बदल्यांबाबत अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतरही परब मंत्रिपदावर चिटकून राहणे यांच्या विरोधात भाजपा लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Share