“…कारण प्रत्येकाला आई असते!” : केदार शिंदे

 ‘बाईपण भारी देवा’नंतर आता ‘आईपण भरी देवा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

केदार शिंदे यांच्या “बाईपण भारी देवा” या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील गाण्यांना, कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता केदार शिंदे यांनी आज महिला दिनानिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव आईपण भारी देवा असं असेल असे त्यांनी सांगितले आहे. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली आहे.

पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन केदार शिंदेंनी कॅप्शनमध्ये लिहिलं,”प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’” आईपण भारी देवा या चित्रपटाच्या पोस्टरवर “…कारण प्रत्येकाला आई असते!” असं लिहिलेलं दिसत आहे.

#२०२५ मध्ये हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल असं पोस्ट मध्ये लिहिला आहे .

 

Share