करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेवर खळबळजनक आरोप

कोल्हापूर-  करूणा मुंडे यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळ जनक आरोप केले असून त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

करुणा मुंडे यांनी यावेळी म्हटलं की, “जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे”. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Share