केसरकर तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही – अमोल मिटकरी

मुंबई : राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही.” अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

दिपक केसरकर काय म्हणाले होते?

पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते की, नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. तर छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. तसेच राज ठाकरे यांच्या पाठिशीही पवारांचे आशीर्वादच होते. कारण पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्य केसरकरांनी केले होते.

Share