काॅंग्रेस अध्यक्षपदी खरे की थरुर, आज फैसला

नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि खासदार शशी थरुर हे दोन मोठे नेते आम सामने होते. दरम्यान, आज मतमोजणी होणार असून दोघांपैकी कोण काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केलं होतं.  सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी ९६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या ९,९०० प्रतिनिधींपैकी ९,५०० प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत १०० टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास ९० टक्के मतदान झाले होते.

Share