हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

अनेकजण दररोज साखरेचा चहा पितात. साखरेचा चहा पिणं आपल्या आरोग्याला घातक ठरू शकतं. साखरेचे जास्त सेवन केल्याने भविष्यात मधूमेह होण्याची शक्यता असते. पंरतु, तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यामध्ये गुळाच्या चहा प्यायल्याने विविध फायदे होतात. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्याने हिवाळ्यात थंडीमुळे होणाऱ्या सर्दीपासून आपला बचाव होतो. तसेच गुळाचा चहा प्यायल्याने थंडी कमी वाजते.

गुळाच्या चहाचे फायदे काय ?

  • गुळात फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही महत्त्वाची खनिजं , अ आणि ब ही जीवनसत्त्वं असतात. गुळाचा चहा पिल्याने गुळातील या आरोग्यदायी घटकांचा लाभ शरीरास होतो.
  •  गुळाचा चहा पिल्याने पचन व्यवस्थित होतं. गॅस, अँसिडिटी हे त्रास दूर होतात. गुळात कृत्रिम गोडव्याचं प्रमाण कमी असतं.
  •  गुळाचा चहा पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. गुळाची प्रकृती ही उष्ण असते.त्यामुळे थंड वातावरणानं होणार्‍या आजारांचा धोका कमी होतो. सर्दीमुळे घशात होणारा संसर्ग गुळाचा चहा पिल्याने दूर होतो. थंडीत शरीरात ऊब निर्माण करण्याचं काम हा चहा करतो. सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय म्हणून गुळाच्या चहाला महत्त्व आहे. तसेच गुळात महत्त्वाची खनिजं असतात जी हाडं आणि सांधे मजबूत करण्याचं काम करतात.
  •  गुळाचा चहा पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते, तणाव आणि थकवा दूर होतो. शरीर डिटॉक्स करण्याचे गुणधर्म गुळाच्या चहात असतात.
  • गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं गुळाचा चहा पिल्यानं शरीरास लोह मिळतं आणि रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत मिळते.
  • गुळाचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहातो. शिवाय हा चहा मासिक पाळी सुरु असताना पिल्यास मासिक पाळीत पोटात, कमरेत, ओटीपोटात होणार्‍या वेदना कमी होतात.
  •  गूळ जेव्हा कमी प्रमाणात सेवन केला जातो तेव्हा तो वजन नियंत्रित ठेवण्यास आणि कमी करण्यास मदत करतो. गुळाच्या चहामुळे चयापचय क्रिया सुधारते, त्यामुळे अन्नाचं पचन नीट होतं.म्हणून गूळ वजन कमी करण्यास विशेषत: पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होण्यास मदत होते. गुळाचा चहा पिल्यानं सारखा चहा पिण्याचा मोह कमी होतो. साहजिकच गुळाचा चहा पिल्यानंही वजन कमी होण्यास मदत होते.
Share