आंतरराष्ट्रीय- युक्रेन आणि रशियामध्ये सध्या कोणत्याही क्षणी युध्द होण्याची शकत्या वर्तवली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेची स्थिती असून रशियाकडून युद्ध छेडले जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा खुद्द युक्रेनकडूनचं केला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतण्याच आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे .
Embassy of India in Kyiv asks Indians, particularly students whose stay is not essential, to leave Ukraine temporarily in view of uncertainties of the current situation pic.twitter.com/U15EoGu89g
— ANI (@ANI) February 15, 2022
या संदेशपत्रात दुतावासाने म्हटले आहे की, सध्याची युक्रेनमधील अनिश्चिततेची स्थिती पाहता इथे असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना इथे राहणे गरजेचे नाही त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मायदेशी परतावे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की युक्रेन अंतर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावेत. भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहिती द्यावी. यामुळं दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरवण्यात येईल, असंही या संदेशपत्रात लिहिलं आहे.
रशिया उद्या युक्रेनवर हल्ला करणार?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं की, रशिया १६ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करणार असल्याचे समजतेय . यासाठी आम्ही १६ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करणार आहोत. देशातील नागरिकांना राष्ट्रगीत वाजविणे, देशभरात ध्वज फडकणे व निळ्या-पिवळ्या फिती घालण्याचो आवाहन करण्यात आले आहे.