आज ‘करवा चौथ’ जाणून घ्या तुमच्या शहरात चंद्र किती वाजता दिसेल

पती- पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्तव असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा खास उपवास ठेवतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहारा पाहतात. कचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात.

कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून रात्री चंद्रदर्शन व त्यानंतर पतीचा चेहरा पाहिल्यानंतर हा उपवास सोडला जातो. पुराणांनुसार चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडावयाचा असतो यंदा आजच्या १३ ऑक्टोबर दिवशी करवा चौथ साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक महिला हे व्रत करतात. तर. मग जाणून घेऊया ‘करवा चौथ’चा चंद्र पाहण्यासाठी मुंबई, दिल्ली, पुणे शहरात नेमका चंद्रोदय किती वाजता आहे?

दिल्ली चंद्रोदयाची वेळ –
दिल्ली शहरात चंद्रोदय रात्री ८:०९ वाजता होणार आहे.

मुंबई चंद्रोदयाची वेळ –
मुंबई मध्ये चंद्रोदय रात्री ८:४८ वाजता होणार आहे.

पुणे चंद्रोदयाची वेळ –
पुणे शहरात चंद्रोदय रात्री ८:५४ वाजता होणार आहे.

Share