नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना या पोटनिवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
समाजवादी पार्टी द्वारा लोकसभा क्षेत्र मैनपुरी उपचुनाव – 2022 हेतु श्रीमती डिंपल यादव पूर्व सांसद को प्रत्याशी घोषित किया गया है। pic.twitter.com/gZIvtETfLT
— Samajwadi Party (@samajwadiparty) November 10, 2022
डिंपल यादव ३ वर्षानंतर निवडणुकीच्या आखाड्यात परतणार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये कन्नौजमधून लोकसभा लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. ४४ वर्षीय डिंपल ५ व्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. समाजवादी पार्टीने मैनपुरीमधून उमेदवारी देण्याच्या मुद्यावर डिंपलसह तेजप्रताप यादव व धर्मेंद यादव यांच्या नावावर चर्चा होती. मात्र अखेर डिंपल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.