Lok Sabha Bypoll Election: मुलायम सिंहांच्या जागेवर सुनबाई मैदानात

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना या पोटनिवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.

डिंपल यादव  ३ वर्षानंतर निवडणुकीच्या आखाड्यात परतणार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये कन्नौजमधून लोकसभा लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. ४४ वर्षीय डिंपल ५ व्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. समाजवादी पार्टीने मैनपुरीमधून उमेदवारी देण्याच्या मुद्यावर डिंपलसह तेजप्रताप यादव व धर्मेंद यादव यांच्या नावावर चर्चा होती. मात्र  अखेर डिंपल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Share