राज्यभरात मनसेने पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणांमध्ये इशारा दिल्याने यात आणखी भर पडली. दरम्यान ठाकरे यांनी पुण्यात महाआरती केली होती. औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे यांच्यासाठी १०० ब्राह्मणांनी मंत्रपठणही केलं. या कार्यक्रमांना वसंत मोरे यांची उपस्थिती दिसली नाही. मोरे नाराज असल्याच्या बातम्या कायम चर्चेत राहिल्या.
मात्र, मोरेंनी यावर स्पष्टीकरण देणं टाळलं. त्यांच्या फेसबूक पोस्ट मार्फत त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला. अखेर मोरेंनी आज पुण्यात महाआरतीचं आयोजन केलं आहे. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पुन्हा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
पुण्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच मोरेंनी आरंभलेल्या महाआरतीकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.