योगींकडून सल्ला घेत नाही तर देतो; भाजप नेत्याचं मनसे कार्यकर्त्याला प्रत्युत्तर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही असा इशारा उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी थेट राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनाच फोन केला.

यावेळी त्यांच्यात काही सेकंदाचे संभाषण झाले. यावर आम्ही सल्ला घेत नाही तर योगींना आम्हीच सल्ला देतो असं म्हणत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे कार्यकर्त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याची एक ऑडिओ क्लीप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नमस्कार. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. माझे नाव तुलसी जोशी आहे. मी राज ठाकरे यांचा छोटासा मनसैनिक आहे. आपण प्रभू रामचंद्र अयोध्यामधून खासदार आहात. राज ठाकरे यांच्याविरोधात विधान केले तर तुमच्या नावाची गिनिज बुकमध्ये, लिम्का बुकमध्ये तुमची नोंद होणार नाही.

तुम्ही राज ठाकरे यांच्याबाबत विधान केले आहे. पण तुम्ही समजूतदार व्यक्ती आहात. त्यामुळे याबाबत योगींकडून सल्ला घ्या. योगींचा सल्ला घ्या असं म्हणताच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपलं परखड मत मांडलं. योगींकडून आम्ही सल्ला घेत नाही. योगींना गरज पडली तर त्यांनी आमच्याकडून सल्ला घ्यावा असं म्हटलं आहे. याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share