९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी राज्यमंत्री बनसोडे यांची निवड

लातूर :  उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण काल राज्यमंत्री बनसोडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, स्वागताध्यक्ष पदाचा सन्मान मला दिला गेल्याचा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. या साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार पालकमंत्री अमित देशमुख राहणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी जाहीर केले आहे. या संमेलनामुळे उदगीरचे नाव जगभरात होणार आहे. संमेलनात जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला सामावून घेतले जाणार असल्याचे बनसोडे यांनी म्हंटले आहे.

 

साहित्य संमेलनाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यात येऊन बोधचिन्हाचे प्रकाशन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष व संयोजक बसवराज पाटील-नागराळकर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, संस्था सचिव मनोहर पटवारी, उपविभागीय अधिकारी प्रवीण मॅगशेट्टी, मनोहर पटवारी, सभापती शिवाजीराव मुळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, संस्था उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्याधिकारी भारत राठोड, नाथराव बंडे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, चंद्रकांत पाटील-कोळखेडकर, मल्लिकार्जुन मानकरी, महादेव नौबदे, जितेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.

Share