“माफिया सेनेच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश….”,किरीट सोमय्या

पुणे- पुणे महापालिकेच्या जम्बो कोव्हिड सेंटर कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत त्यांना धक्कबुक्की केली . त्यात किरीट सोमय्या हे खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी  ट्विट करत म्हंटल आहे की माफिया सेना मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही.

सोमय्या यांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे की, पुण्यातील संचेती रुग्णालयातून मला डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेत जाऊन संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच हे माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही. अशी टिका करत त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडतानाचे फोटो शेअर केले आहेत.

 

Share