महाविकास आघाडी आणि भाजप ओबीसी आरक्षणाचे मारेकरी – प्रकाश आंबेडकर

मुंबई : ओबीसी आरक्षणावर  सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सराकरच्या वतीने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. त्यामुळे पुढील निर्देश देईपर्यंत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. वंचित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात असल्याचे म्हटले आहे.

भाजप, शिवसेना, काॅँग्रेस, राष्ट्रवादी हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या चारही पक्षांना ओबीी बांधवांनी मतदान करु नये.मागासवर्गीय आयेागाचा अहवाल कोणतेही संशोधन न करता सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यामुळे न्यायालयाने हा अहवाल फेटाळला. यासाठी सर्वस्वी भाजपच जबाबदार असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच आरक्षण संदर्भात कायदा करुन सर्वेाच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याची चांगली संधी राज्य शासनाला होती, पंरतू सरकारने अद्याप काहीही केले नसल्याचे आंबेडकरांनी  म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी हे लुटारू सरकार असल्याची टीकाही केली.

Share