आंतरराष्ट्रीय- कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणावरून राज्यातील वातावरण चिघळ आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र होत असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटतांना दिसत आहेत. यामुळे शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला आहे.याप्रकरणी आता नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. मलालाने ट्विटरवरुन या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.
“College is forcing us to choose between studies and the hijab”.
Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I
— Malala (@Malala) February 8, 2022
कॉलेजमध्ये अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास प्रशासन भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हि भयावह परिस्थिती आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे, असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.आता कर्नाटक उच्च न्यायालय हिजाब प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच लक्ष लागून आहे.