बारावीचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

 पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी घेण्यात येणाऱ्या १२ वी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले आहे.

www.mahahssboard.in वरून हॉलटिकीट डाऊनलोड करू शकतात. तसेच शाळा आणि महाविद्यालयातून ऑनलाईन हॉलतिकीटची प्रिंट मिळणार आहेत.

राज्यात बारावी परीक्षांसाठी १४,७२, ५६४ विद्यार्थी बसले आहेत. यंदा ‘झिग झॅक’ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असं शिक्षण मंडळाने सांगितले आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा ऑफलाईन परीक्षा घेणाचा निर्णय शिक्षण मंडळाने आधीच जाहीर केला होता. त्यानुसार मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा होईल. तर १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल.

बारावी परीक्षेचे वेळापत्रक-

 • ४ मार्च – इंग्रजी
 • ५ मार्च – हिंदी
 • ७ मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
 • ८ मार्च – संस्कृत
 • १० मार्च – फिजिक्स
 • १२ मार्च – केमिस्ट्री
 • १४ मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
 • १७ मार्च – बायोलॉजी
 • १९ मार्च – जियोलॉजी
 • ९ मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
 • ११ मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
 • १२  मार्च – राज्यशास्त्र
 • १२  मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
 • १४  मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
 • १९ मार्च – अर्थशास्त्र
 • २१ मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
 • २३ मार्च – बँकिंग पेपर – १
 • २५ मार्च – बँकिंग पेपर – २
 • २६ मार्च – भूगोल
 • २८ मार्च – इतिहास
 • ३० मार्च – समाजशास्त्र
Share