मलिक दाऊदचा माणूस; तरीही तो मंत्रिमंडळात कारण….

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली. आता या प्रकरणात मलिकांच्या आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर ट्वीट मध्ये म्हणतात, नवाब हा दाऊदचा माणूस आहे. तरीही तो मंत्रिमंडळात आहे. याची दोन महत्वाची कारण म्हणजे पवार आणि ठाकरे… असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट द्वारे म्हटलं आहे.

मलिकांच्या विरोधातील ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?

नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीने गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला. नवाब मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर या दोघांसोबत अनेकदा बैठक केली. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे एक गाळा अडवून ठेवला.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा त्याच्यासोबतही बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीने गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला अशी कबुली हसीनाच्या मुलाने दिली आहे. त्यानंतर कालांतराने ही सर्व मालमत्ता नवाब मलिक यांना विक्री करण्यात आली. ईडीने आपल्या चार्जशिटमध्ये १७ जणांना साक्षीदार केलं आहे. या दोषारोपपत्राची दखल घेत स्पेशल कोर्टाने नवाब मलिक आणि १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान या दोघांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Share